घराच्या प्लॅनसाठीचे महत्त्वाचे मुद्दे
... घराचा आराखडा तयार करताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट कोणते मुद्दे लक्षात घेतात ?...
घराचा आराखडा (प्लॅन) तयार करताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करतात.त्यातील काही महत्वाचे मुद्दे पाहू. त्यातील एक म्हणजे घरातील अंतर्गत रचना आणि दुसरी म्हणजे बाह्यरचना. या प्लॅनच्या रचनेसाठी ज्या मुद्द्यांचा विचार केला जातो त्यांना ' प्लॅनिंगसाठीची नियोजन तत्त्वे' म्हटले जाते. ही तत्त्वे बरीच विस्तारित आहेत. त्यातील काही ठळक व थोडकी तत्त्वे या लेखात स्पष्ट केली आहेत. ही तत्त्वे कशा प्रकारे वापरली जातात आणि कोणत्या तत्त्वांना विशेष महत्व द्यावे ते या लेखात पाहू.
१) बाह्यरचनेसाठीची नियोजन तत्त्वे : घराच्या इमारतीचा प्लॅन तयार करताना आत्तापर्यंत झालेले आजूबाजूच्या परिसरातील बदल त्याचप्रमाणे भविष्यात होणारे बदल गृहीत धरणे महत्त्वाचे आहे. यामुळे घरातील सदस्यांबरोबरच आजूबाजूच्या लोकांचेही राहणीमान सुखदायक, आरोग्यदायी आणि प्रसन्न राहते . यासाठी प्रथमतः प्लॉटच्या आजूबाजूचा परिसर आणि रस्ते यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. रस्त्याच्या बाजूला घराच्या इमारतीची मूळ चौकट ठेवली जाते. त्याचप्रमाणे हॉल आणि पोर्चसुद्धा रस्त्यालगत असणे सोयीचे ठरते. पोर्चचा वापर हा पार्किंगसाठी किंवा तात्पुरत्या उठण्या बसण्यासाठी केला जातो.
त्याचबरोबर भविष्यासाठीची तरतूद म्हणून रस्त्यालगतच्या बाजूस पूरक अशी जागा सोडून इमारतीच्या इतर तिन्ही बाजूना थोडी जागा मोकळी जागा म्हणून ठेवली जाते. रस्त्याकडेची बाजू जास्त महत्त्वाची असल्याने इतर तीन बाजूंपेक्षा या बाजूला जास्त जागा सोडली जाते. ही मोकळी जागा सोडण्याचा मूळ उद्देश्य घरात हवा खेळती राहावी त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा सहजपणे पुरवल्या जाव्यात असा असतो.
जेव्हा मूळ बांधकामास सुरुवात करावयाची असते त्यावेळेस दरवाजा आणि खिडक्यांसाठीच्या चौकटीचा विचारही बाह्यरचनेसाठी केला जातो. जेणेकरून तिन्ही ऋतूंचा यामध्ये विचार करून घरात सूर्यप्रकाश आणि हवा योग्य प्रमाणात येण्यास मदत होईल. दरवाजा आणि खिडक्यांची चौकट यांचाही बाह्यरचनेमध्ये प्रमुख वाटा असतो. यासाठी यांचा विचार करताना बाह्यरचनाही आकर्षक दिसावी अशी त्यांची रचना करावी.
२) अंतर्गत रचनेसाठीची नियोजन तत्त्वे : घराच्या आराखड्यासाठीची अंतर्गत रचना करताना प्रामुख्याने ' उत्तरायण ', ' दक्षिणायन ' आणि ' ऋतू ' यांचा विचार केला जातो. जेणेकरून हवा घरात खेळती राहावी आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाशही मिळावा याबरोबरच प्रस्तावित, खोल्यांचे एकत्रीकरण, घरात ये-जा करण्यासाठीचा पॅसेज, स्वच्छताविषयक सेवा, आरोग्य , आर्थिक बजेट इ. या सर्वांचा विचार केला जातो. आता अंतर्गत रचना करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले जातात ते पाहू.
या खोल्यांच्या रचनेतही काळानुसार आणि गरजेनुसार बदल होत आहेत. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे हॉल कम डायनिंग किंवा किचन कम डायनिंग, स्टडी रूम्स,इ. गोष्टीही वाढत आहेत. त्याचप्रमाणे घरामध्ये गार्डन एरिया, व्यायामासाठीची जागा याही नवीन संकल्पना येऊ लागल्या आहेत. अशाप्रकारे घराचा आराखडा तयार करताना कुटुंबातील सदस्य, त्यांच्या गरजा,आजूबाजूचा परिसर या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्याचप्रमाणे घर बांधताना कॉन्ट्रॅक्ट द्यावे कि, घर स्वतःच बांधून घ्यावे याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. या विषयाची माहिती पुढील लेखात स्पष्ट करू.
सारांश: या लेखात घराचा प्लॅन ठरवताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करतात हे स्पष्ट केले आहे. या लेखामध्ये त्यातील काही ठळक मुद्द्यांची ओळख व्हावी आणि त्यांचा अर्थही स्पष्ट व्हावा असा प्रयत्न केला आहे.
... घराचा आराखडा तयार करताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट कोणते मुद्दे लक्षात घेतात ?...
घराचा आराखडा (प्लॅन) तयार करताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करतात.त्यातील काही महत्वाचे मुद्दे पाहू. त्यातील एक म्हणजे घरातील अंतर्गत रचना आणि दुसरी म्हणजे बाह्यरचना. या प्लॅनच्या रचनेसाठी ज्या मुद्द्यांचा विचार केला जातो त्यांना ' प्लॅनिंगसाठीची नियोजन तत्त्वे' म्हटले जाते. ही तत्त्वे बरीच विस्तारित आहेत. त्यातील काही ठळक व थोडकी तत्त्वे या लेखात स्पष्ट केली आहेत. ही तत्त्वे कशा प्रकारे वापरली जातात आणि कोणत्या तत्त्वांना विशेष महत्व द्यावे ते या लेखात पाहू.
![]() |
| बाह्यरचनेसाठीची नियोजन तत्त्वे |
त्याचबरोबर भविष्यासाठीची तरतूद म्हणून रस्त्यालगतच्या बाजूस पूरक अशी जागा सोडून इमारतीच्या इतर तिन्ही बाजूना थोडी जागा मोकळी जागा म्हणून ठेवली जाते. रस्त्याकडेची बाजू जास्त महत्त्वाची असल्याने इतर तीन बाजूंपेक्षा या बाजूला जास्त जागा सोडली जाते. ही मोकळी जागा सोडण्याचा मूळ उद्देश्य घरात हवा खेळती राहावी त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा सहजपणे पुरवल्या जाव्यात असा असतो.
जेव्हा मूळ बांधकामास सुरुवात करावयाची असते त्यावेळेस दरवाजा आणि खिडक्यांसाठीच्या चौकटीचा विचारही बाह्यरचनेसाठी केला जातो. जेणेकरून तिन्ही ऋतूंचा यामध्ये विचार करून घरात सूर्यप्रकाश आणि हवा योग्य प्रमाणात येण्यास मदत होईल. दरवाजा आणि खिडक्यांची चौकट यांचाही बाह्यरचनेमध्ये प्रमुख वाटा असतो. यासाठी यांचा विचार करताना बाह्यरचनाही आकर्षक दिसावी अशी त्यांची रचना करावी.
![]() |
| भारताचे भौगोलिक स्थान |
![]() |
| खिडक्यांच्या चौकटींची रचना |
- चौकटींची रचना: अंतर्गत रचनेचा विचार करताना महत्वाच्या तिन्ही ऋतूंचा विचार करणे सोयीचे ठरते. त्यामुळे खिडक्या आणि दरवाज्यांची व्यवस्था अशा प्रकारे असावी जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा त्रास घरामध्ये उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा आणि उन्हाळ्यात हवा खेळती राहावी. याबरोबरच बदलत्या जीवनशैलीप्रमाणे खिडक्या आणि दरवाज्यांच्या चौकटींच्या व्यवस्थेतही बदल होत असतो. पूर्वी खिडक्या ह्या
- खोल्यांचे एकत्रीकरण: प्रत्येक खोलीचे घरामध्ये एक विशेष कार्य असते. त्यामुळे घराचा आराखडा तयार करतेवेळी त्या खोल्यांचे योग्य ठिकाण आणि त्यांचे कार्यानुसार एकत्रीकरण यांचा विचार करणेही महत्वाचे असते. घरातील खोल्या किचन, हॉल, बाथरूम, टॉयलेट आणि जीना यांचे त्यांच्या कार्याप्रमाणे एकत्रीकरण कसे करावे हे पाहु. घरातील सर्वात महत्वाची खोली म्हणजे किचन. किचन हे प्रामुख्याने पूर्व दिशेस असावे. ज्यामुळे सकाळी पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशातील UV किरणांमुळे जीव-जंतू नष्ट होतील आणि घरातील वातावरण आरोग्यदायी राहील. त्याचप्रमाणे बेडरूमचे ठिकाण हे पश्चिमेकडे असणे सोयीचे ठरते. सायंकाळच्या वेळी हवा हि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पश्चिमेकडील हवेमुळे घरात हवाही खेळती राहते. त्याचबरोबर बाथरूम आणि टॉयलेटची व्यवस्था अशा प्रकारे असावी कि ते सर्वाना कॉमन म्हणून वापरता येईल आणि प्रायव्हसीही राहील. जिन्याचा विचार करताना जिना हा शक्यतो मध्यभागी ठेवला जातो जेणेकरून सर्व खोल्यांमधून तिथे लगेच पोहोचता येईल.
![]() |
| घराचा आराखडा |
सारांश: या लेखात घराचा प्लॅन ठरवताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करतात हे स्पष्ट केले आहे. या लेखामध्ये त्यातील काही ठळक मुद्द्यांची ओळख व्हावी आणि त्यांचा अर्थही स्पष्ट व्हावा असा प्रयत्न केला आहे.

Very good
ReplyDelete