async='async' crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6496105907091667'/> HOME CONSTRUCTION : 2019

Saturday, 20 July 2019

HOW TO FIX HOME BUDGET?

           

                    घराचे बजेट कसे ठरवावे ?
घर बांधताना बजेटसाठी विचारात घ्यावयाचे तीन प्रमुख मुद्दे :
१) उपलब्ध जागेवरून बजेट तयार करणे 
२) उपलब्ध बजेटवरून  घराचे बांधकाम करणे 
३)कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्या गरजा 


१) उपलब्ध जागेवरून बजेट तयार करणे बऱ्याचदा बजेट ठरलेले नसते. पण घर बांधकामासाठी जागा अपुरी असते. या वेळी मुख्य प्रश्न असा असतो की जागा कमी आहे तर घर बांधकाम कसे होईल आणि त्यासाठी बजेट किती येईल? उदा. उपलब्ध प्लॉटचे क्षेत्रफळ ८०० स्क्वे. फूट आहे, पण ३ बेडरूम, १ हॉल ,१ किचन अशी घराची इमारत बांधावयाची आहे. अशा वेळी अनेक मजली इमारत बांधणे सोयीचे ठरेल. घर बांधताना कुटुंबियांच्या गरजा व भविष्यातील तडजोडी यांचा विचार करणेही आवश्यक आहे. 

२) उपलब्ध बजेटवरून  घराचे बांधकाम करणे :  अनेकदा बजेटचा आकडा हा ठरलेला असतो आणि तेवढ्याच बजेटमध्ये आपणास हवे तसे घर बांधावयाचे असते. उदा.  बजेट रु. १५,००,००० आहे आणि घराचे बांधकाम २ बेडरूम, १ हॉल आणि १ किचन करावयाचे आहे. अशा वेळी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सोयी मिळाव्यात असा ही  विचार असतो. अशा वेळी बजेट वरून घराच्या बांधकामाचे क्षेत्रफळ (स्क्वे. फूट) निश्चित करून बजेट मध्ये घर बसवता येऊ शकते. 

३)कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्या गरजा :
                      घर बांधकाम करताना कुटुंब हा प्रमुख घटक आहे. ' व्यक्ती तितक्या प्रकृती ' त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची गरज वेगवेगळी, अशावेळी त्यांच्या गरजा विचारात घेणे महत्वाचे ठरते . उदा. घरात वावरणाऱ्या प्रौढ व्यक्ती, लहान मुले, येणारे पाहुणेमंडळी या सर्वांचा विचार करून घर कसे असावे, त्यात सोयीसुविधा कशा असाव्यात या सर्वांचा विचार करून घरासाठीचे क्षेत्रफळ निश्चित करून बजेट ठरवावे.  
                      बजेट ठरवताना वरील मुद्यांचा आधार घेऊन आपणास किती खोल्यांची गरज आहे हे ठरवावे. त्याच प्रमाणे इमारतीचे बांधकाम किती स्क्वे. फूट करावयाचे आहे ते ठरवावे. या सर्व मुद्यांचा विचार करून आपणास घराची इमारत १ मजली किंवा अनेक मजली बांधावयाची आहे हे ठरवावे. 

  • कुटुंबातील व्यक्त्तींनुसार घरासाठी किती खोल्या असाव्यात व बांधकामाचे क्षेत्रफळ किती असावे? 

   प्रत्येक  व्यक्तीच्या आयुष्यातील मूलभूत गरजांपैकी निवारा ही मूलभूत गरज आहे. आयुष्यात आपले स्वतःचे घर असावे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपण व आपले कुटुंब सुरक्षित आणि आपल्या मालकीच्या छत्राखाली असावे या विचारातून आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. ६० वर्षांआधीचा काळ लक्षात घेता जेव्हा घरातील कर्ता व्यक्ती ६० ते ७० वर्षे वयात पदार्पण करेल तेव्हा तो स्वतःचे हक्काचे घर बांधू  शकत होता. पण जस जसा काळ बदलेले तस तसे कमी वयातच घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे.
                                        सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेता वय वर्ष ३५ ते ४० पर्यंतचा गट स्वतःचे घर बांधण्यासाठी पुढे सरसावत आहे. बदलत्या युगानुसार व काळाच्या गरजेनुसार हे वय अधिकच कमी होत आहे. या बदलांनुसार आपणही बदलणे गरजेचे आहे. तेव्हा भविष्याऐवजी वर्तमानाचा विचार करणे सोयीस्कर ठरेल. तेव्हा सध्या घर बांधण्याबाबत भविष्यासाठी तडजोड न करता ते बांधावे. अर्थात काळानुसार गरजा बदलतात, मुलांच्या भविष्याचा विचार करून कमी आकाराच्या खोल्या बांधणे सोयीचे होणार नाही तर खोल्यांचा आकार योग्य प्रमाणात मोठा ठेवून आनंदाने घरात वास्तव्य करावे. कारण जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा जीवनशैली बदलेली असेल. आणि या बदलेल्या जीवनशैलीप्रमाणे पुढची पिढी राहणीमनात बदल करेल. तेव्हा सध्याच्या जीवनशैलीचा संदाज घेऊन योग्य त्या रीतीने घराची रचना असावी. 
                                      आता घरातील सदस्य, त्यांच्या गरजा व त्यानुसार घराची रचना कशी असावी ते पुढील लेखात स्पष्ट केली जाईल. 

सारांश: सदर लेखात घरासाठी कसे  बजेट ठरवावे हे स्पष्ट केले आहे. तसेच आमच्या निरीक्षणातून येणारे ३ महत्वाचे मुद्दे कशा प्रकारे लक्षात घ्यावे हे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर कुटुंबाच्या गरजा व बदलणारी जीवनशैली कशी विचारात घ्यावी यासाठीही हा लेख उपयोगी ठरेल. 

बदलती जीवनशैली आणि माझे घर

                                               बदलती जीवनशैली आणि माझे घर ...           घरातील खोल्यांची रचना करताना बदलत्या जीवनशैलीचा व...